Tuesday, 25 September 2018

रातराणीची दरवळ-अलक 1

रातराणीची दरवळ 1...

अति लघु कथा...

1.
बाबा,किती उशीर केलात हो घ्यायला यायला.सगळे मित्र गेले घरी 10 मिनिटे होऊन गेली.बाबांकडुन साँरी रे बाळा.
तीस वर्षानंतर...
वाटल होत आज तरी पत्र येईल.कोणी तरी न्यायला येतो म्हणुन,पण वेळ होऊन गेली पोस्टमनची.बघु उदया येईल बहुतेक,सहा महिने झाले नातवांना पाहुन...

2.
किती ऊन आहे.बसावे म्हणले तर कुठे सावलीही नाही.ह्या परिसराच्या विस्तारात इथले पिंपळाचे 50-60 वर्षे जुने झाडं काढुन टाकले होते.किती रडले होतो त्या दिवशी बाबा आपले.आज छोट्या ला उन्हाचा त्रास होतो.बाबांची अन झाडाची दोन्ही सावल्या नसल्याचे दु:ख एकदाच दाटुन आले.

3.
ऊन्हाच्या झळा बसताना एकीकडे मुंग्याची लाबलचक रांग तर दुसरीकडे सिग्नल सुटल्यावर वाहनांची मोठी रांग,पण खुप फरक होता त्यांच्या ह्या वागण्यात.
पावसाच्या रिमझिम सरी,सिग्नलवर रेनकोट घालुन वाहनांची गर्दी रोजसारखी.मुंग्या आत्ता अन्न जमा करुन पावसात निवांत बसल्या होत्या पण माणुस त्याच रोजच्या प्रश्नात अजुनही अडकला आहे.

4.
फाटके कपडे लपवत ती काम करत होती.सकाळी ती आल्यापासुन जरा दुर्लक्षच केले होते.दिसत असुनही.आपल्याच रोजच्या धावपळीत कोणासाठी वेळ कुठे असतो माणसाला.तेवढ्यात भाजी चिरताना बोट कापले गेले अन भळाभळा रक्त वहायला लागले.तिने पटकट हळद घेतली व आधीच फाटकी असलेल्या साडीचा तुकडा फाडुन बांधला बोटावर.किती सहजता होती तिच्या त्या कृतीत...


@ प्राजक्ता रुद्रवार
    

No comments:

Post a Comment