#एक धागा सुखाचा...
भाग# 1
नव्याने जाँईन झालेल्या समीराबद्दल सर्वांनाच खुप उत्सुकता असते.एकदम डँशिंग,आकर्षक बांधा,सुंदर चेहरयाची समीरा चार दिवसांपुर्वीच बदलुन आली होती मुंबईला.नवीन असल्यामुळे आँफिसमधे चार्ज घेण्यातच वेळ जात होता तिचा गेले दोन तीन दिवस.त्यामुळे बाकीच्याशी बोलण्याचा विशेष वेळ तिला मिळालाच नव्हता.
चार दिवसाच्या सुट्टीनंतर राकेश आफिसमधे जाँईन झाला तर त्याला नवीन कोणीतरी मुलगी दिक्षितांचा चार्ज घेते आहे,इतकच मोघम कळलं होतं.दिक्षित काय अन नवीन मुलगी काय,आपल्याला सगळे सारखेच असे खांदे उडवत पुटपुटत तो कामाला लागला.
पण राकेश म्हणाला तसं सगळ्याचं मत नसतं.सिनियर पोस्ट वर मुलगी हे खुप लोकांना जीवावर येतं तसं काही जणांना होत होतं आँफिसमधे.त्यात इतकी लहान वयाची मुलगी डायरेक्ट सिनियर पोस्टवर आली होती.त्यामुळे आता अश्या लहान वयात अनुभव नसलेल्या मुलीकडुन आपण शिकायचे असली कुजबुज सुरु झाली होती. समीरालाही हे जाणवलं की असं काहीतरी आपल्याविषयी सुरु आहे.पण मुळातच समंजस असलेल्या समीराने सहजपणे दुर्लक्ष करुन स्वत: पुढाकार घेऊन बोलण्यास सुरुवात केली.हळुहळु पंधरा दिवसात तिची सगळ्यांशी ओळख झाली.नेहा तिच्याच डिपार्टमेंटमधे असल्यामुळे तिच्याची जरा जास्त संवाद होत असे.
राकेश अन समीराचा प्रत्यक्ष भेटीचा योग कधी आलाच नव्हता आतापर्यंत.नेमका चार दिवस सुट्टीच्या साठी दिक्षितांना सांगितले होते आणि ते अप्लिकेशन हरवल्यामुळे पुन्हा हवे आहे असा नेहाचा काँल एचआर मधुन आल्यामुळे राकेश त्या डिपार्टमेंटमधे गेला.नेमकी नेहा तिथे नसल्यामुळे नवीन कोण बाई आली आहे तिला अप्लिकेशन देऊन निघावे का विचारात असतानाच समीराच्या केबिनचा दरवाजा उघडुन ती बाहेर येताना एक क्षण थबकली.अचानक दार उघल्यामुळे राकेशही एकदम दचकला.
"येस,तुमचं काही कामं होत का?",समीराने असा प्रश्न विचारताच तो भानावर येत म्हणाला,"हो म्हणजे,नेहा ला अप्लिकेशन दयायचे होते पण ती जागेवर दिसत नीहिये,तर तुम्हाला देऊन जाऊ का विचारच करत होतो अन अचानक तुम्ही दरवाजा खोलुन बाहेर आलात म्हणुन एकदम गोंधळुन गेलो हो मी."
"ओह,सो साँरी,या ना,"असं हसुन म्हणत ती केबिन मधे गेली व तिच्या पाठोपाठ राकेशही आला.खरतरं बरेचदा दिक्षित असताना ह्या केबिनमधे आलो होतो पण आज एकदम फरक जाणवतं होता.कुठल्यातरी पर्फ्युमचा मंद सुवास येत होता.टेबल साफ होतं.सगळं कसं टापटिप वाटतं होतं.खुप प्रसन्न वाटलं त्याला आल्याबरोबर.दोनचं क्षणात त्याच्या नजरेने प्रसन्नता टिपली डोळ्यांनी आणि त्यालाच हसु आले.
"साँरी हं,एकदम आले बाहेर,"असं समीराने म्हणताच त्याला हसु आले.
"अहो,ठिक आहे ना,माझं पण जरा चुकलंच,एकदम दाराशी उभा होतो,"समीरने असे म्हणत तो अप्लिकेशनचा कागद पुढे सरसावला.
"अरे हो,तुमचं काय काम होतं ते विचारलचं नाही",असं म्हणत समीराने कागद हातात घेतला.
ती अप्लिकेशन वाचताना नकळतंच राकेश तिच्याकडे पहात होता.काहीतरी वेगळं आहे ह्या मुलीमधे असं त्याला वाटलं.आजपर्यंत कितीतरी मुली पाहिल्या आपण.पण असं काय आहे की आपल्याला पहिल्या नजरेत खिळवुन ठेवते आहे असा विचार करत होता तो.राकेश आपल्याकडे टक लावुन पहात आहे हे जाणवताच समीराला जरा अवघडल्यासारखं झालं.
"अहो,शुक शुक,मिस्टर....,"असे म्हणत तिने त्याला आवाज दिला.
"राकेश...राकेश नावं आहे माझं...बोला काय म्हणत होतात आपण..."राकेश उत्तरला.
"अहो,तुमचं हे काम झाल असं समजा,अजुन काही काम होतं का? असं विचारतं होते मी,"समीराने सरळच विचारुन टाकलं.
त्यावर "नाही...बसं हेच काम होतं...थँक्यु तुम्ही मदत केलीत", म्हणत नाईलाजाने उठावे लागल्या सारखा उठला.
समीराला ते चटकन जाणवलं व पाठमोरया जाणारया त्याच्याकडे बघुन हसतंच ती कामाला लागली.
बाहेर पडल्यावर मात्र राकेशला जाणवलं की आपण काहीतरी वेगळं वागलो.पण करणारचं काय असं मनमोहकं व्यक्तिमत्व पहिल्यांदाच पाहिलं होतं त्याने.त्यामुळे नकळतंच असं वागलो आपण असं स्वत:ला म्हणत तो स्वत:च्या केबिन मधे गेला....
-क्रमश:
© प्राजक्ता रुद्रवार
No comments:
Post a Comment