#दिशाभुल
अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा तिसरा काँल आहे.काही भांडण झालयं का तुमच्या दोघांच?सायली प्रश्नांवर प्रश्न विचारत चालली होती.नेहा मात्र शांतपणे छताकडे बघत पडली होती.सायलीला कळत नव्हते की काय झालय ह्या मुलीला.आजकाल काय ही अशी विचित्र वागत आहे अशी.तेवढ्यात तिचा फोन वाजला म्हणुन सायली बोलत बोलत बाहेर पडली.
नेहा आणि सायली गेले वर्षभर सोबत रहात होत्या ह्या मुलींच्या हाँस्टेलवर.सायली एका आयटी कंपनीमधे लागली आणि पुण्यात आली होती.त्याच दरम्यान नेहा ही नागपुर वरुन इंजिनिअरिंग करुन पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आली होती.कंपनीच्या जवळ हाँस्टेल म्हणुन दोघीही तिथेच आल्या व त्यांची ओळख झाली होती.पहिल्याच भेटीत दोघींनाही एकमेकींविषयी चांगल्या भावना वाटल्या व त्यांनी एकाच रुम मधे रहायचे ठरविले होते.आणि आजपर्यंत त्या मस्त जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या.
पण गेले काही दिवस नेहा मधे बराच बदल दिसत होता.हसरी मस्ती करणारी नेहा जरा स्वत:मधेच रहात होती आजकाल.आपणही कामाचे टेंशन असेल म्हणुन जरा कानाडोळाच केलाय.पण आज जरा बोलावेच लागेल असे दिसते आहे म्हणत सायली कामाला लागली.
नेहाला आज सुट्टी असुनही काही उत्साह वाटत नव्हता.रोहनचे तीन काँल येऊन गेले.तेही आपण उचलले नाहीत पण त्याला काँल करुन आपण आज भेटु शकत नाही.बिझी आहोत असे सांगावे का असा विचार तिच्या मनात आला.पण तेही न करता अशीच लोळत पडली होती.तेवढ्यात सायलीने बोलत बोलत तिच फोन हातात दिला.रोहन होता फोनवर.नेहा फोन का उचलतं नाहिये विचारायला त्याने सायलीला काँल केला होता.रोहनशी मोघमच बोलुन नेहाने फोन ठेवला.फक्त हो नाही असेच उत्तर देत होती ती.
नेहा,रोहनला टाळत आहेस का? काही भांडण झालय का तुमच्यात?काही चुकलंय का गं त्याचं?असं सायलीने विचारता नाही गं,अस चटकन उत्तर आलं नेहाच्या तोंडुन.रोहन खुप चांगला आहे.त्याच काही चुकलं नाहीये.काय सांगावं सायलीला असा विचार करत नेहा चुप झाली.पण मग कोणाचं चुकतयं....
रोहनचा विचार आला की नेहाला खुप भरुन आले.किती चांगला मुलगा आहे ना रोहन असे म्हणत ती भुतकाळात गेली.
पुण्यात जाँईन होऊन जेमतेम महिना झाला असेल.आँफिसमधे उशीर झाल्यामुळे आता बस मिळेल की नाही ह्या विचारात पळतच नेहाने लिफ्टचे बटन दाबले.लिफ्टला वेळ दिसला म्हणुन ती पायरयांनी जावे म्हणुन मागे वळली नाही तर एका मुलाशी तिची जोरदार टक्कर झाली.काय हो डोळे नाहियेत का? असे म्हणत तिने हातातुन पडलेली टिफिन बँग उचलली.साँरी म्हणत तो उचलायला लागला.तिच्या त्या लगबगीचे त्याला खुप हसु येत होते.काय हो भारत पाक युध्दासाठी तुम्हाला सरकारने तातडीने बोलावले आहे का म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले.त्याचा प्रश्न एक क्षण न कळल्यामुळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहाणारया नेहाला पाहुन तो जोरदार हसला.
बसमधे बसल्यावर नेहाला सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि तिलाच हसु आलं.आपल्याच आँफिस मधला कोणीतरी दिसतोय,चुक नसतानाही तोच साँरी म्हणाला ह्याची तिला गंमत वाटली.
दुसरया दिवशी लंचच्या वेळेस तोही कँन्टिन मधे दिसला तिला.तिने त्याच्याकडे पाहुन स्मितहास्य केले.मी रोहन असं म्हणत तोही जाँईन झाला तिला.मग दोघेही गप्पा करत जेवले.जाँली स्वभावाचा रोहन चांगल्या घरातला होता.कोणालाही आपलसं करावं असंच व्यक्तिमत्व होतं त्याचं.सतत हसरा चेहरा,प्रसन्न व्यक्तिमत्व असलेला रोहन तिला खुप आवडला.एकाच बिल्डिंगमधे दोघांचे आँफिस होते.त्यामुळे जेवणाच्या वेळेस कँटिंनला दोघांची भेट होत असे.
रोहन पुण्यात लहानाचा मोठा झाला होता.त्याची आई वकील व वडिल इंजिनियर होते.एकुलता एक वाढलेला रोहन अजिबात लाडावलेला नव्हता.लहानपणापासुन त्याच्यावर खुप चांगले संस्कार झाले होते.खुप सारे जीवाभावाचे लोक जोडले होते त्याने आणि आता तर त्याची नेहाशी मस्त गट्टी जमली होती.गेले वर्षभर दोघे मस्त फिरत होते.दोघांच्या आवडी निवडी पण खुपश्या मिळत होत्या.त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पिक्चर,वाचन,ट्रेकला जाणे काहीतरी प्लान करत असत दोघं.
नेहाही सतत उत्साही,हसतमुख असे.त्यामुळे त्यालाही ती खुप आवडतं असे.पण गेले काही दिवस नेहा सतत विचारात असते,नीट बोलत पण नाहिये.काय झालं असेल बरं नेहाला,रोहन विचारात पडला होता....
चार महिने झाले असतील आदित्यला टिम लिडर म्हणुन जाँईन होऊन.नेहा त्याच्याच टिम मधे होती.जाँईन झाल्यापासुनच आदित्यने कामाची पध्दत बदलली होती.उशीर झाला तरी टार्गेट पुर्ण पाहिजे असे त्याला.नेहाला असे पण वेळेतच करायची सवय होती.त्यामुळे तिला विशेष फरक वाटला नाही.लहान वयात,कमी काळात ती बरचं काही शिकली होती.
एका प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे नेहा व आदित्यचे बरेचदा संभाषण होत असे.परंतु नेहा आपल्याला हवा तसा भाव देत नाही असे आदित्यला वाटु लागले.त्यामुळे तो जरा विचारात पडला होता.त्याने तिला केबिन मधे बोलावले."मिस नेहा,तुम्हाला आजच क्वार्टर्ली प्लँनिंगचे सगळे डिटेल्स मेल करायला सांगितला होते,केलेत का तुम्ही? "असे आदित्यने विचारताच " हो "म्हणाली नेहा.मग मला तुमच्या स्पीडचे कौतुक वाटते म्हणत आदित्यने तिला हात मिळविण्यासाठी हात पुढे केला.त्यावर नेहाने जरा बळजबरीनेच हात पुढे केला होता.पण का कोण जाणे, आदित्यच्या विषयी तिला नकारात्मक भावना जास्त येत असतं.त्यामुळे ती कामापेक्षा शब्दही जास्त बोलत नसे त्याच्याशी.आणि नेमकं हेच त्याला खटकतं असे.
खुपदा जाणुन बुजुन काम नसतानाही बोलावणे हे नेहाला कळत होतं.कधी काहीतरी कागद देताना स्पर्श करणे तिला जाणवत होता.त्यातुन आदित्यची मानसिकता कळत होती तिला.पण तिने जरा दुर्लक्षच केले होते.
बँकेच्या प्रोजेक्टवर असल्यामुळे खुप नाजुक काम होते.सगळ्या जबाबदारया नेहावर टाकल्यामुळे तिला टेंशन येत होते.पण तिच्या टिममधे कमी लोकं असल्यामुळे आपल्याला कामाचे बर्डन येत असेल असे तिला वाटले.मग काम संपायला उशीर झाला म्हणुन तिला आँफिस मधे थांबावे लागत होते उशीरा पर्यंत.
रोहनला भेटायला जमले नाही की आपलं मन लागतं नाही.त्याचंही लागतं नाही.रोहनने तिच्यासाठी एक पुस्तक आणलं होतं गिफ्ट.आपण दोघं प्रेमात पडलो आहोत हे दोघांना कळत होतं पण तसं ते व्यक्त केलं नव्हतं दोघांनी.त्यांना त्याची गरजच वाटली नव्हती कधी. दोघांनाही हे नातं खुप हवहवसं होतं.जसा वेळ मिळेल तसा सोबत घालवावा म्हणुन ते शोधात असतं.रात्री उशीरापर्यंत मेसेज करुनही त्यांच्या गप्पा संपत नसत.
आदित्यच्या आल्यानंतर काय काय घडत आहे हे सर्व तिने रोहनला सांगितले होते बोलताना.आदित्य आल्यापासुन होणारा मानसिक त्रास पण सांगितला होता तिने रोहनला.पण मला ही नोकरी खुप महत्वाची आहे,माझ्या इंजिनियरिंगसाठी काढलेले कर्ज मलाच फेडायचे आहे असे ती नेहमी म्हणत असे रोहनला.आजकाल नोकरी मिळणे किती कठिण झालं आहे हेही खरं होतं.रोहन तिला म्हणाला पण होता की तु जर तुझं काम करत असशील तर नोकरी टिकेलच गं पण त्यासाठी उगाच काहीही ऐकुन घेऊ नकोस त्याचे.
नेहालाही तसेचं वाटतं होते.लवकरच हा प्रोजेक्ट संपवुन दुसरया प्रोजेक्टमधे जाँईन व्हावं असं तिला वाटतं होतं.काही महिनेच तर काढायचे आहेत,हा प्रोजेक्ट संपला की झालं असा विचार करुन तीने स्वत:चे सांत्वन केलं होत जणु...
आणि आज नेमकं नेहाला काम संपत नव्हते.दुपारी जेवतानाही रोहनला काँल करुन सांगितले होते तिने की तु जेवुन घे.उदया दुपारी अकराच्या आधी डेटा पोहोचला नाही तर आदित्यचा रिमार्क येईल.चापलुसी करणारया मुलीसाठी आदित्य छान बाँस होता.त्या लगेचच आदित्यशी सलगीने वागायच्या.पण नेहा असल्या गोष्टी करत नसल्यामुळे तिला जरा कठिण जात होते.त्यामुळे आज लेट झाला तरी काम संपवुन जाऊयात विचाराने नेहा उशीरापर्यंत थांबली होती.रोहनला तु जा मी काम संपवुन येते म्हणुन सांगितलं होत तसं तिने.त्यामुळे गेला पण असेल असा विचार तिच्या मनात येऊन गेला.
बराचसा स्टाफ गेला होता.नेहा आपल्या टेबलजवळ बसुन काम करत होती.तेवढ्यात आदित्यने काँल करुन बोलावले.जरासं नाखुशीनेच ती उठली.
"मिस नेहा,तुम्हाला हे आँफिस म्हणजे धर्मशाळा वाटते का?",असा प्रश्न आदित्यने विचारताच ती एकदम दचकली."तुम्हाला वाटेल तितकावेळ आँफिस मधे बसुन रहायला ही काही धर्मशाळा नाहिये",हे त्याचे ऐकुन तिला खुप संताप आला.पण तरीही शांतपणे ती म्हणाली की नाही "सर,वेळेत करायचाच प्रयत्न करत होते.पण काम जरा जास्त आहे".ती असे बोलत असताना आदित्य खुर्चीवरुन उठुन तिच्या जवळ येऊन त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.तसेच एकदम अंदाज नसल्यामुळे दचकलेली नेहा मागे सरकली.तसा तो पुढे सरकुन म्हणाला,"मिस नेहा,तुम्ही स्वत:ला काय समजता हो?" आदित्यच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नेहा पटकन उठुन केबिनच्या बाहेर निघाली पण आदित्यने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला.नेहाने हाताला जोरात झटका देऊन हात सोडवला व आदित्यच्या जोरात एक थोबाडीत लगावुन देऊन ती झपझप पावलं टाकतं केबिनच्या बाहेर पडली.कोणालाही काय झालं कळायच्या आत ती आँफिस मधुन धावतच खाली आली.
खाली आल्यावर बस स्टाँपवर येऊन तिने सायलीला काँल केला.पण ती आधीच निघाल्यामुळे बसमधे होती.त्यामुळे सायलीला मोबाईल वाजलेला कळलाच नाही.एकटचं जायचं ह्या विचाराने नेहाला खुप अस्वस्थ वाटतं होतं.ती बसस्टाँपच्या दिशेने निघाली आणि तेवढ्यात कोणीतरी खांद्यावर घट्ट ठेवला.एकदम दचकुन तिने मागे पाहिले तर रोहन हसत उभा होता.रोहनला समोर पाहुन तिला हायसं वाटल.ती एकदम रोहन तु म्हणुन त्याच्या गळ्या पडली व तिला अश्रु अनावर झाले.रोहनला कळेना की अचानक काय झाले नेहाला.काहीही न बोलता आताच्या क्षणी नेहाला फक्त त्याचा आधार हवा होता.त्यानहीे तिच्या पाठीवर हात ठेवुन दोन मिनिटे रडु दिले.मग हळुच विचारले की "काय झाले तुला नेहा? सांगशील का मला.
हे ऐकुन तिने आँफिसमधला सर्व किस्सा त्याला सांगितला.सांगताना नेहा खुप रडत होती.रोहन मात्र संतापाने तिला म्हणाला की "खुप छान झालं तु एक लगावलीस त्याला.गरजच होती त्याला.तो आता हिम्मत नाही करणार ह्यापुढे असं कोणाशी वागायची आणि मी आहे ना,चल,डोळे पुस बरं" असं म्हणत त्याने नेहाचे डोळे पुसले.तिच्या डोक्यावरुन हात फिरवुन ,"You are brave girl Neha" असं रोहनने म्हणताच नेहाला खुप बरं वाटलं."आपण रस्त्याच्या बाजुला उभे आहोत,कोणी बघेल तर मीच काही तरी केलं तुला असं समजेल,तुला उशीरा बस मिळेल न मिळेल म्हणुन मी पण इथेच टाईमपास करत होतो. बरं झाल थांबलो मी ते,चल,तुला सोडुन मी घरी जातो,"म्हणाला रोहन.पहिल्यांदा रोहनच्या खांद्यावर डोक टेकवलं होतं नेहाने,एका विश्वासाने,जो तो त्याच्या प्रत्येक कृतीतुन देत होता....
इकडे आदित्यचा संतापाने थरकाप होत होता.आजपर्यंत त्याला कोणी नाही म्हणाले नव्हते.किती तरी मुलींशी त्याचा नेहमी संपर्क येत असे पण कोणीही त्याच्याशी असं वागलं नव्हतं.तोही अजिबात गंभीर नव्हता कधी अश्या गोष्टीत,फक्त टाईमपास म्हणुन मुलींकडे बघायचा.पण त्यामुळे जस्ट टाईमपास म्हणुन काही मुलीही त्याला साथ देत.नेहा मात्र वेगळी निघाली सगळ्यात.त्यामुळे तो अजुन जिद्दीला पेटला होता.पण असं काही होईल असं त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं.काय करु काय नको म्हणत तोही घरी गेला.पण संतापाने त्याला अस्वस्थ होत होते."लवकरच तुझा बदला घेईन मी नेहा", म्हणत तो विचार करत होता.पण नक्की काय करणार हे त्याला देखिल माहीती नव्हते.अपमानाचा बदला घेतला पाहिजे फक्त हेच दिसत होते त्याला.
रात्रभर नेहाला झोप लागली नाही.हाँस्टेल जवळ सोडताना रोहनने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला की,"नेहा,तु जे केलं आहेस ते एक सामान्य मुलगी करु शकली नसती.अश्या वृत्तीला आळा बसेल तुझ्यासारख्या मुली पुढे आल्या तर,हिम्मत ठेव,मी तुझ्या पाठीशी आहे.तुला काहीही वाटलं तर मला सांग.मी येईन मदतीला".नेहाच्या डोळ्यातुन अश्रु टपकायला लागले.रोहनने तिचे डोळे पुसले व कपाळावर ओठ टेकवले आणि तो गेला.नंतर किती तरी वेळ नेहा त्याचाच विचार करत होती.रोहन किती चांगला मुलगा आहे.आज वर्षभर आपण सोबत आहोत पण कधीही त्याने काहीही वेडवाकडं केल नव्हतं आपल्यासोबत.कितीदा दोघं एकटे होतो पण अविश्वास वाटला नाही त्याच्याविषयी.त्यामुळे पुरुषी वृत्ती तरी कसे म्हणायचे.दोघांमधे किती तफावत होती,विचारांमधे,वृत्तीमधे,वागण्यामधे.त्यामुळे उगाचच समस्त पुरुषजातीला कशाला नाव ठेवायचं असं तिला वाटलं.
रात्री सायलीला सगळं सांगितल्यामुळे ती उठवायला आली लक्षात ठेवुन तर नेहा रोहनशीच बोलत बोलत तयार होत होती.नेहाचा मुड ठिक आहे बघुन ती पण कामाला लागली.आँफिसची वेळ होत होती,तिला पण निघायचं होतचं.नेहा पण तयार होऊन बसने निघाली.सकाळ पासुन रोहनने तिला हिम्मत दिल्यामुळे ती नेहमीप्रमाणे आँफिसला निघाली होती."तुझी काही चुक नाही तर तु आँफिसला का सुट्टी घ्यायची? तुझ्या अश्या वागण्याने तुझीच चुक आहे असे वाटेल.तर तु छान आत्मविश्वासाने आँफिसमधे जाणार आहेस"असं रोहनने म्हणलेलं तिला पटलं होतं.बघु तिथे गेल्यावर काही वाटले तर परत येता येईल म्हणुन ती रोजच्या वेळेत आँफिसला निघाली होती.
खरतरं आँफिसच्या कँम्पस मधे येतानाच तिला धडधड करत होतं.कसा सामना करणार आपण आदित्यचा असा विचार करत होती ती.वर आल्यावर तिला कळलं की आदित्य आज सुट्टीवर आहे म्हणुन त्या निरोप आला होता.तिला खुप हायसं वाटलं.बहुतेक तोच आपल्याला घाबरला असेल असे वाटुन तिला एकदम हसु आलं.लगेचच तिने रोहनला मेसेज पण टाकला.एकदोन दिवसात तो विसरुन जाईल.मग सगळं ठिक होईल असा विचार करुन ती कामाला लागली.
आदित्य सुट्टी घेऊन घरी बसला खरं पण त्याच्या डोक्यात सतत अपमानाची आग पेटलेली होती.एक सामान्य मुलगी मला नकार देते ह्यापेक्षाही जास्त म्हणजे तिने आपल्या थोबाडीत लगावली होती.खर तरं असं काही आपण केलं पण नव्हतं.काय म्हणुन तिने असा अपमान करावा.अश्या मुली ढिगाने मागेपुढे करतात आपल्या.हिला काय वाटतं स्वत:विषयी माहीती नाही.पण तिला सरळ केले पाहिजे,माफी मागायला भाग पाडायचे तिला असं म्हणत विचार करत असताना त्याला मित्राचा फोन आला.भेटायचं का म्हणताच आदित्यने होकार दिला.
आँफिसमधे कुणालाही काही कळलं नव्हतं पण तरीही नेहाला चांगल वाटतं नव्हतं.दुपारी जेवणास येणार का म्हणुन रोहनचा काँल आला त्यामुळे नेहाला उत्साह आला.नेहा कँटिनला पोहोचली तर रोहन आधीच तिची वाट बघत बसला होता.रोहनला पाहुन नेहाच्या चेहरयावर हसु आलं. "रोहन,तु जर सकाळी मला हिम्मत दिली नसतीस तर आज मी अशी इथे दिसले नसते " म्हणत नेहाने रोहनला मनमोकळं मत सांगुन टाकलं.त्यावर हसत रोहनने तिला म्हंटल,"आत्मविश्वास बाळगला तर आज बरयाच स्त्रिया अश्या लोकांपासुन वाचतील.जाऊ दे,आता तो विषय नको, पण एक सांगु का?"
"काय रे,विचारतोस काय असं?" नेहा
"आता तुला साथ द्यायचीच म्हणुन तुला वचन दिलं आहे तर अडकलो ना मी,आता माझी सुटका नाही ",रोहनने हसत म्हंटले.
"काय रे काही पण"म्हणत नेहा चक्क लाजली.
"नेहा,सिरियसली,ह्या प्रकरणामुळे आपण अजुनच जवळ आलो.आपलं प्रेम अव्यक्त होतं.मला प्रर्कषणाने जाणवलं की मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही,तुला असं अडचणीत बघुन मला खुप त्रास झाला,कधी जाणवलं नव्हतं पण तुला दु:खी पाहुन रात्रभर झोप आली नाही",नेहाचा हात धरत रोहनने तिचा हात हातात घेतला.
"खरं आहे रोहन,तु आधीपासुन माझ्या मनात होतास पण कधी वाटले नाही की ह्यालाच प्रेम म्हणतात.आपल्या अव्यक्त प्रेमाला आज बोल मिळाले",म्हणत नेहाने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला.
तेवढ्यात सायलीने पाठीवर थाप मारल्यामुळे हात काढुन घेत नेहा एकदम लाजत उठलीच.
"अगं,असु दे,मी काही पाहिलं नाही आणि ऐकलही नाही", म्हणत सायली जोरात हसली.
मग तिघेही हसतं गप्पा मारत जेवुन पुन्हा कामाला लागले.कालचा ताण गेल्यासारखा वाटला तिला.
दुसरया दिवशी सकाळी नेहा नेहमीप्रमाणे आँफिसमधे आली.
आज आदित्य आला होता आँफिसमधे त्यामुळे नेहाच्या मनावर नकळत दडपण आले.पण जसं काही झालंच नाही असं आदित्य नाँर्मल वागताना बघुन तिला आश्चर्याचा धक्काच बसला जरा.असं कसं झालं विचार करत ती काम करत होती.हे वागण खरं असेल तर मग मस्तच आहे असं तिला वाटलं.आदित्य डायरेक्ट समोरासमोर यायचं टाळतचं होता पण ते तिलाही बरं वाटलं.उगाचच समोर जाऊन आठवण कशाला करुन द्यायची असे तिला वाटले.संध्याकाळी तिने रोहनला सांगितल सगळं,त्यालाही जरा बरं वाटलं.
पण आज पंधरा दिवस सगळं ठिक होत मग अचानक असं काय झालं हे कळतं नव्हतं त्याला.कालपासुन नेहा फोन घेत नाहिये.आधी वाटलं की असेल बिझी काही कामात.पण मेसेजेसला उत्तर पण देत नाही म्हणुन त्याला काळजी वाटु लागली होती.अशी कशात इतकी बिझी आहे म्हणुन राग पण येत होता त्याला.सकाळी फोन नाही उचलला तर हाँस्टेलवर जाऊयात ठरवुन तो पडला तरी त्याला झोप लागतं नव्हती.कधी डोळा लागला हे त्याला कळलं नाही.
पहाटे जाग आल्यावर आधी सायलीला फोन केला तर ती म्हणे की,"काल आँफिस मधुन आल्यापासुनचं तिचा मुड खराब वाटला पण मला वाटलं की तुम्ही दोघं कशावरुन तरी भांडला आहात,थांब बघते" म्हणुन तिने नेहाला फोन दिला होता.पण फोनवर पण नेहा जुजबीच बोलली होती."मला तुला भेटायचं आहे रोहन ",म्हणाली फक्त.रोहनच्या जीवात जीव नव्हता.लगेचच तो तिच्या हाँस्टेल कडे निघाला.
पण नेहाने सांगितलेले ऐकुन त्याला धक्काच बसला.नेहा रडत होती,रोहनला पाहुन त्याच्या कुशीत शिरली व मनसोक्त रडली.मग जरा शांत झाल्यावर सांगु लागली की तिचा व्हिडिओ करुन पुर्ण आँफिसमधे शेअर झाला होता,आज दुपारी लंचनंतर तिला कळले होते.कुठुन कोणाकडे आला हे कळले नव्हते पण तिचा अश्लिल व्हिडिओ बनवुन कोणीतरी सगळी कडे पाठविला होता.त्यामुळे ती आँफिसमधुन आल्यापासुन एकटीच असल्यामुळे सतत रडत होती.आज किती मोठ्या बदनामीला तिला तोंड द्यावं लागणार होतं.माहीती आहे की असे फेक व्हिडिओ असतात तरीही आज तिचं नाव घेतलं जाणारंच होतं.
"तु मला कालच का सांगितल नाहिसं,का रडत बसलीस एकटीच,बघुयात कोण आहे ह्यामागे",म्हणत रोहनने तिला हलकेच थोपटलं आणि तोही विचारात पडला.
रोहनने सांगितल्याप्रमाणे दुसरयादिवशी सकाळी मनाच्या तयारीने नेहा आँफिसला जायला निघाली खरी पण तिला खुपच नकोसं वाटतं होतं.कसं तोंड देणार आपण सगळ्यांच्या नजरांना हे तिला कळत नव्हतं.पण रोहन सोबतचं बोलण तिला आठवलं.
"उद्या तु आँफिसला जाणार आहेस नेहा,असे अनेक आदित्य येत रहातील आयुष्यात,त्यांना धडा शिकवायचा की असे लपुन बसायचे तुझ्यासारख्या मुलीने",रोहन म्हणत होता.
"रोहन,आजपर्यंत कशालाही न घाबरता तोंड देणारी मी,पण आज खरचं थकले रे.इतक्या खालच्या पातळीवर जाऊन लोक वागत असतील तर काही रहात नाही रे जगात जगण्या सारखे",नेहा उत्तरली.
"हो,म्हणुनच ह्या अश्या लोकांची पातळी जगाला कळली पाहीजे,त्यांनी पुन्हा दुसरयासोबत असे करु नये म्हणुन तु पुढे होऊन धडा शिकवला पाहिजे आणि ते तु करु शकतेस."रोहन म्हणाला होता.
आँफिसमधे तिला आलेलं पाहुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.पण स्वत:ला नाँर्मल ठेवत ती स्वत:च्या जागेवर जाऊन बसली.नाही म्हंटल तरी सगळ्या आँफिसभर चर्चा सुरुच होती.ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता गेले दोन दिवस.नेहासारखी चांगली मुलगी असे काही करणार नाही ह्यावर सगळ्यांचा विश्वास होता पण तरीही तो अश्लील व्हिडिअो बघुन काय म्हणावे हे कळत नव्हते.
जागेवर बसल्यावर तिनेच आपणहुन न लाज वाटुन घेता हिम्मत करुन बाजुला बसलेल्या,साधारण पन्नाशीच्या तिवारींना विचारले की "कालचा व्हिडिओ मला शेअर करालं का?",त्यांना खुप आश्चर्य वाटले.
"नेहा,तुम्हे पता है क्या व्हिडिओ के बारे मे?",त्यांनी विचारले.
"हा,आैर मुझे इसे गलत साबित दिखाने के लिये मुझे आपके जैसे अच्छे लोगोंकी मदत लगेगी तिवारीजी",नेहा उत्तरली.
"तुम मेरी बेटीकी उम्र की हो नेहा,पता है तुम अच्छी लडकी हो,एेसे कुछ कर नही सकती हो,मेरी तरफसे जो मदत होगी वो मै करुंगा,"म्हणत तिवारींनी तो व्हिडिओ तिला पाठवला.
रोहनची आई वकिल असल्यामुळे आपण तिचा सल्ला घेऊयात असे रोहनने सुचवताच नेहा नको म्हणाली."पुढे त्या मला सुन म्हणुन स्विकारणार नाहीत ",असे ती म्हणाली.पण त्यावर तो म्हणाला की "अरे,मला तुला असेही भेटवायचे होते,दोन्ही काम होतील,आई खुप वेगळी आहे,तु भेट तर एकदा,"म्हणत रोहन ने आग्रहाने नेहाला घरी नेले.
रोहन म्हणाला त्याच्या शंभरपटीने त्याची आई कुल होती.त्यांना पण गोड नेहा पहिल्याच भेटीत खुप आवडली.जरासं खाणं पिणं झाल्यावर त्या मळ मुद्दयावर आल्या.आधीच रोहनने नेहाच्या ह्या व्हिडिओवाल्या प्रकरणाविषयी त्यांना सांगितलेच होते.त्यामुळे त्यांनी नेहाला बरेच प्रश्न विचारले.मग तिला त्यांनी तिला रितसर सायबर क्राईमचा नंबर दिला.आणि त्यांनीही काँल करुन सांगितलं की काय झालं आहे."तुझी लढाई तुलाच लढायची आहे नेहा" असं म्हणत त्यांनी नेहाला थोपटलं.
तिवारींनी पाठवलेला व्हिडिओ तिने मि.अजय ना दाखवला.मि.अजय हे क्राईम ब्रँच हेड होते.त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली.इकडे मात्र आदित्यला वाटलं की नोकरीची गरज असल्यामुळे कशी आली सरळ नेहा आँफिसला.त्याला असुरी आनंद मिळत होता तिची बदनामी होताना बघुन.पण दोन दिवसापेक्षा जास्त वेळ त्याचा आनंद टिकु शकला नाही.
आज अचानक पोलिस आले होते आँफिसमधे त्याच्या नावाचा अटक वाँरंट घेऊन.त्याच्यासाठी हा खुप मोठा धक्का होता.आधी तुम्ही असं कसं करु शकता म्हणुन संतापलेल्या आदित्यला मि.अजय ने सगळे पुरावे दाखवलेले.अगदी नेहाला हात पकडण्याच्या सीसीटिव्ही मधे मिळालेल्या कव्हरेज पासुन.त्यानेच नेहाचा फोटो क्राँप करुन तो अश्लिल व्हिडिओ बनवुन घेतला होता.ते रँकेट पण त्यामुळे पकडलं गेलं होतं.आता आदित्यला पश्चातापाशिवाय काहीही उरलं नव्हतं.
आँफिसमधे सगळे नेहाच्या धाडसाचे कौतुक करत होते.तिने आज हे पाऊल उचलले नसते तर आदित्य पकडला गेला नसता.तिच्या सारख्या बरयाच मुलींना त्याने त्रास दिला असता.
पण नेहा मात्र रोहनचे आभार मानत होती. "रोहन,तुझ्यासारखा माझ्यावर विश्वास ठेवुन मला सपोर्ट करणारा व मला योग्य दिशा दाखविणारा जोडीदार मिळाला,ही खुप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी.नाहीतर अश्यावेळेस लोक दुर जातात आपल्याच माणसांपासुन,खरं खोटं जाणुन न घेता."असं म्हणताना नेहाच्या डोळ्यातुन अश्रु वाहतं होते.तिचे डोळे पुसतं ,"अगं राणी,खर प्रेम कायमं तुमच्या पाठीशी असतं.काळ,वेळ फक्त बदलत असतात.आता हे सगळं विसरुन नवीन आयुष्याला सुरुवात करुयात,"म्हणतं रोहनने तिला जवळं घेतलं.
© प्राजक्ता रुद्रवार
No comments:
Post a Comment