Tuesday, 25 September 2018

कथा-स्विकार...

# स्विकार...

साकेतला कळतं नव्हतं की काय चुकलं आपलं म्हणुन भैरवीने बोलणं बंद केल होतं.तिच्या मनातं नक्की काय वादळ सुरु आहे कळत नव्हतं.तसं तर भांडण म्हणावं असंही काही झालं नव्हतं.मग नेमकं भैरवी अशी का वागली याचा अंदाज घेत तो भुतकाळात शिरला.

काँलेजच्या पहिल्या दिवशी खरं तर खुपच आठवणीत रहावा असा होता.मस्त तयार होऊन साकेतने नवयुवका प्रमाणे काँलेजच्या जीवनात प्रवेश केला होता.छान मार्क्स मिळविले म्हणुन त्याला बाबांनी बुलेट घेऊन दिली होती.त्यामुळे तर आज चिरंजीव हवेतच होते.काँलेजच्या बाहेर स्टाईलगिरी करत जाताना एक मुलगी त्याचा धक्का लागुन एका मुलीच्या हातातील पुस्तकं पडली होती.ओये मिस्टर,आंधळे आहात का म्हणुन जोरात आवाज ऐकुन तो थांबला व रिटर्न येऊन तिच्या डायरेक्ट समोरच उभा राहिला.भैरवीला तशी अपेक्षा नसल्यामुळे ती एकदम चपापली.
"काय म्हणत होतात हो मिस,बोला.." साकेत म्हणाला.
"तुम्हाला दिसत नाही का म्हणत होते मी," भैरवी उत्तरली.
"दिसतं नाही हो मला पण सेल्फी काढत भर रस्त्यावर मागे मागे येताना बहुदा तुम्हाला मागचं दिसतं होतं वाटतं,"साकेतच्या ह्या प्रश्नाने भैरवी जरा बावचळली.
"अहो,मिस्टर माझ्यामते माणसाला मागे डोळे नसतातं.तुम्हीच समोर बघुन चालवायला शिका,"भैरवीने रागातच उत्तर दिले.
"मिस,एखादी सुंदर मुलगी स्वत:हुन येऊन धडकायला लागली तर डोळ्यांना काय छान वाटेल,धडकतीलच की हो ते आपोआप,"साकेतने असं हसतं म्हंटल्यावर मात्र काय बोलावं न कळता भैरवी क्लासरुम कडे निघाली.हसत हसत साकेतही वर्गात आला.

काँलेजचा पहिला दिवस म्हणुन सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.साकेतचे मित्र त्याची वाट पहातच होते.वर्गात येऊन बसताना मुलींची खुप कलकल ऐकु येत आहे म्हणुन वळुन बघतो तर त्याला ही सेल्फीवाली मुलगी दिसलीे.त्याला पटकन हसुच आले की काय गम्मत आहे म्हणुन.पण तिचे लक्ष नव्हते त्याच्याकडे.गप्पांमधे ती खुप रंगली होती.आपण कशाला विचार करायचा असं म्हणुन तो वळला आणि तेवढ्यात सर आले म्हणुन सगळे पटापट आपल्या जागेवर बसले.

मग सुरुवातीला स्वत:चा परिचय करुन देऊन सगळ्यांनी आपापला परिचय करुन द्यावा असे सरांनी सुचविले.मग काय एक एक जण स्वत:विषयी सांगायला लागला.साकेतचा नंबर आला तर भैरवी पहातच राहीली.अरे हा तर धडकलेला असे म्हणत ती त्याच्याकडे पाहुन हसली.नेमकं त्याच वेळेस साकेत तिच्याकडे पाहत होता.तोही ओळखीनेे हसला.नेमकी आपली चोरी पकडली जावी असं वाटुन भैरवी जराशी लाजलीच.खरंतर काही मिनिटांची ही नजरानजर बरचं काही बोलुन गेली.मग रितसर सगळ्यांचे परिचय करुन घेण्यातच वेळ गेला.आज दोन लेक्चर्स नंतर तसेही काँलेज सुटणार होते.कसा वेळ गेला कळलं नाही.काँलेज सुटलं आणि सगळे आपापल्या घरी निघाले.

काँलेजच्या पहिल्याच दिवशी बरचं काही घडुन गेलं होतं.साकेतला राहुन राहुन भैरवीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.काय जादु आहे त्या डोळ्यांमधे ते कळत नव्हते त्याला.हसतानाचा तिचा चेहरा मग डोळ्यावर येणारी तिची बट,सगळं काही पिक्चर सारखं समोर दिसत होतं त्याला आणि स्वत:च हसु आलं त्याला.काय विचार करत आहोत आपण ह्याचा.

जेवणाच्या टेबलवर गप्पा मारताना भैरवी पण आजचा किस्सा घरी रंगवुन रंगवुन सांगत होती.कशी धडक झाली.कसं झापलं आपण त्या मुलाला वगैरे वगैरे.भैरवीची आई हसुन ऐकत होती लेकीच्या गप्पा.भैरवीचे बाबा मात्र म्हणाले की सेल्फी क्विनला धक्का बसला,अरेरे..तसे लटक्या रागाने त्यांच्याकडे पाहात भैरवी चिडली.पण तिलाही गंमत वाटली.एकदम फिल्मी होतं सगळं.पण अस नवनवीन चालुच राहीलं म्हणुन हसत कामाला लागली ती.

दुसरया दिवशी ती काँलेजमधे गेल्या गेल्या शलाकाने तिला पकडले.काँलेजमधली सगळ्यात अँक्टिव मुलगी असल्यामुळे तिच्याकडे खुप माहीती असे.आल्या आल्या तिने भैरवीचा ताबाच घेतला जणु.
"अगं,आज काँलेजमधे नवीन मुलांसाठी प्रेशर्स पार्टी आहे,आपण जाऊयात हं",असं म्हणत शलाका मुलींच्या घोळक्यात गोंधळ घालत होती."अगं,खुपच छान होईल कार्यक्रम,सिनिर्यस खुप मस्त करतात म्हणे,चला" म्हणत ती मुलींना घेऊन गेली.कार्यक्रम खरच खुपच छान केला होता.सगळ्या ओळखी झाल्यावर साकेतचे नाव पुकारण्यात आले.साकेत कडे पाहिल्याबरोबर हा तर कालचा टक्करवाला मुलगा असे म्हणत भैरवी आता हा काय करणार आहे म्हणुन त्याच्याकडे उत्सुकतेने पाहु लागली.स्टेजवर आल्यावर साकेतने गायला सुरुवात केली, तेरे संग यारा... ".अन सगळेच मंत्रमुग्ध झाले.खुपच छान आवाज होता त्याचा.भैरवी तर आवासुन पहातच राहीली.गातानाही दोघांची नजरानजर झाली.त्या नजरेत बरयाच गोष्टी होत्या.सगळी मुलं वन्स मोर म्हणुन ओरडत होती.कार्यक्रम संपला अाणि मुलांनी साकेतच्या भोवती गर्दी केली.भैरवी भिरभिरत्या नजरेने साकेतला शोधत होती.तेवढ्यात शलाकाने सगळ्याच मुलींच्या ग्रुपला बाहेर काढले.भैरवीला पण बाहेर यावे लागले.पण तिच्या डोळ्यासमोरुन साकेत जातच नव्हता.त्याचा आवाज घुमत होता कानात.

दुसरया दिवशी आता व्यवस्थित काँलेज सुरु झाले.त्यामुळे टाईमपासला वेळच नव्हता मिळाला.भैरवी व साकेतची जस्ट गुड माँर्निग म्हणत नजरानजर झाली.दोघेही चोरटं हसले आणि क्लासमधे बसले.पण भैरवीला खुप वाटतं होतं की साकेतला सांगावं की तु खुपच छान गायलास.ती संधीच्या शोधातच होती.लंच ब्रेक मधे तिला चान्स मिळाला शेवटी.
"कालच गाण खुपच छान झालं.खुप छान आवाज आहे तुझा...",असं भैरवीने म्हणताच साकेत मनापासुन खुष झाला.
"तुला बघुनच म्हणत होतो"असे म्हणत त्याने जीभ चावली स्वत:ची,"म्हणजे म्हणताना बघितले होते तुझ्या कडे असे म्हणायचे होते मला",असे पटकन म्हणाला.भैरवीला खुप हसु येतं होतं त्याची चलबिचल पाहुन."बर,कळलं कळलं,"म्हणत तीही हसली.

हळुहळु साकेत भैरवीची मैत्री पुर्ण काँलेजभर प्रसिद्ध झाली.दोघेही टाँपर्स असल्यामुळे आपला रँक टिकवुन होते.मिळेल तेवढा वेळ ते सोबत असतं.सगळ्यांना वाटायचे की हे दोघे प्रेमात आहेत पण त्यांनी तसे कबुल केले नव्हते.त्यांना त्याची कधी गरज भासली नव्हती.पण आता लास्ट इअर ला जेव्हा कँम्पस मधे साकेतला चेन्नईच्या मोठ्या कंपनीमधे छान पँकेजची जाँब आँफर आली व भैरवीला पण पुण्यात,तेव्हा त्यांना कळत नव्हते की हे चांगले की वाईट झाले.एकमेकांपासुन दुर जायचं ह्या विचाराने दोघेही अस्वस्थ झाले.कसे गेले हे चार वर्ष लवकरच हे कळतं नव्हते.दोघेही अचानक अबोल झाले होते.
"भैरवी,आजपर्यंत कधी म्हंटले नाही पण माझी प्रीत तुला कळलीय का गं,"असे साकेतने विचारताच भैरवीच्या डोळ्यातुन अश्रु वाहु लागले.तिचा हात हातात घेत साकेत म्हणाला की," कधी मी विचारचं केला नव्हता की तुला सोडुन एकटं जगावं लागेल,मी नाही राहु शकणार यार तुझ्या शिवाय,नुसत्या विचारांनीच मला कसंकसं होत आहे.मी हा जाँब नाकारतो आहे.नकोय मला चेन्नई,पुण्यातचं बघतो मी पण काहीतरी".इतकावेळ रडणारी भैरवी लगेच समजुतीच्या स्वरात म्हणाली,"अरे साकेत,दुर गेलो तरी आपली प्रीत कमी होणारं आहे का?काही दिवसांनी पुण्यासाठी प्रयत्न करुयात.सध्या इतका छान जाँब सोडु नकोस.बाकी आपण फोन मुळे तसे सोबतचं रहाणार आहोत."असे म्हणत तिने त्याचा हातावर थोपटले.ते आश्वासक हात बरचं काही बोलुन गेले.भैरवीला गच्च मिठीत घेत साकेत म्हणाला की "पण मला कधी सोडु नकोस गं".त्यावर "असे शक्य आहे का?" म्हणत भैरवीने त्याला समजावले.

साकेत जाँईन झाला आणि भैरवी पण.दोघांनीही घरी सांगितल्यावर दोघांच्याही घरुन होकार होता.तशी त्यांना कुणकुण होतीच.पण मुलांनी सांगितल्यावर दोन्ही घरातल्यांनी आनंदाने होकार दिला.आता दोघांनाही स्वर्ग दोन बोट राहीला होता.दोघेही आपापल्या जाँबमधे खुष होते.सतत फोनवर सोबत रहात असल्यामुळे जरा तरी बरे वाटतं होते.लवकरच साकेतला सुट्टी मिळली की तो पुण्यात येणार होता म्हणुन दोघेही खुष होते.तीन महिनेच झाले असतील भेट झाली नाही आणि भैरवीने बोलणे बंद केले अचानक ह्या धक्क्यातुन साकेत अजुनही सावरला नव्हता.
वेळच वाईट होती तशी.आँफिसमधुन येताना भैरवीचा जबरदस्त अँक्सिडेंट झाला होता. डाँक्टरांनी शर्थीचे प्रसत्न केले तरीही काही उपयोग झाला नाही.भैरवीला ते वाचवु शकले नव्हते.साकेत चे हाल बघवतं नव्हते.

आज बरोबर एक वर्ष झाले होते भैरवीला जाऊन.रोज सतत सोबत असणारया भैरवीने आज ठरविले होते की प्रत्यक्षात नाही म्हणुन आपण सतत त्याच्या अप्रत्यक्ष दुनियेत त्याला सोबत देऊन राहीलो वर्षभर.त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाहीये.आता त्याला सत्यात येऊन स्वत:चे दुसरे जग निर्माण करावेच लागेल.किती दिवस तो असा जगणार, आपल्याशिवाय.त्याच्याच भविष्यासाठी त्याला एकटे सोडणे भाग होते.म्हणुन आज सकाळ पासुन तिने बोलणे बंद केले होते.

सगळे समजवतं होते की साकेत आता तरी बाहेर ये ह्या प्रसंगातुन,आज वर्ष झालं आहे भैरवीला जाऊन.पण साकेतला आज खरया अर्थाने वाटतं होते की भैरवी गेलीये सोडुन.आज खराच तो पार खचला होता.डाँक्टर्स सांगत होते की काही केसेस मधे माणुस मान्यच करत नाही नकोय ते.आज त्याच्या मनाने ते मान्य केलेले दिसते आहे.हे स्विकारणे खुप आवश्यक होते.तसंच काहीस झालं आहे साकेतच्या बाबतीत.आज तो धाय मोकलुन रडत होता.आज त्याने स्विकारले होते की भैरवी त्याला सोडुन गेली आहे.

भैरवीही रडतं होती...एकटीचं....

© प्राजक्ता रुद्रवार

No comments:

Post a Comment